मरकज वरून आलेल्या पैकी ४ रुग्ण पॉझिटिव्ह
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा थांबायचे नाव घेत नसून आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे ९ झाले आहेत, यापैकी चार रुग्ण हे मरकज दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते,याआधी एकूण ५ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता तर चार जण हे जिल्हा सामान्य मक रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर मरकज करून आलेले एकूण १७ नागरिकांना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले होते. एकूण ३० नमुने चेकिंग साठी पाठवण्यात आले होते अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.