बुलडाणा : नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील गुरुवारी १ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले.मागण्या मंजूर न झाल्यास १५ एप्रिल रोजी लेखणी बंद आणि १ मे रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा शासनला दिला आहे. नगरपरिषद कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा पाठपुरावा करण्यात आला असून शासनाने अद्यापही दखल घेतली नाही त्यामुळे गुरुवारी १ एप्रिल रोजी राज्यातील नगर परिषदांसाह बुलडाणा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले .कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हे हत्यार उचलले आहे.
-नगरपरिषद कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या-
१) राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायती मधील कर्म-यांना वेतनासाठी वेळेवर दरमहा १ तारखे पर्यंत अनुदान मिळावे.
२) दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांसारखे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागार कार्यालयातून थेट त्यांच्या खात्यात जमा करावे.
३) सन २०१९ मधील जानेवारी १९ ते ऑक्टोंबर १९ पर्यंतचे थकीत अनुदान अदयापही दिलेले नाही. हे अनुदान तात्काळ वितरीत करुन शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार थेट कोषागार मार्फत करण्यात यावे तसेच सर्व कर्मचारी यांना सेवार्थ प्रणाली लागु करण्यात यावी.
४) शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे फरक हप्ते तात्काळ देण्यात यावी. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणे तात्काळ देण्यात यावी.यासह अन्य मागण्या नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.