April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

बुलडाणा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन ची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत…

जिल्हाध्यक्षपदी वसीम शेख सचिव युवराज वाघ तर कार्याध्यक्ष फहिम देशमुख….

खामगाव : पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 12 वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला , यावेळी असोसिएशन ची नविन कार्यकारणी करीता असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी वसीम शेख, सचिव पदी युवराज वाघ, तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी फहिम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
तर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – जिल्हा उपाध्यक्ष संदिप वानखडे, गोपाल तुपकर, जिल्हा समन्वयक कासिम शेख, संदिप सावजी, जिल्हा संघटक देवीदास खनपटे, राजेश वाढे, कोषाध्यक्ष दिपक मोरे, राजेश बाठे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमूख नितीन कानडजे पाटील, अनिलसिंघ चव्हाण,सोशल मिडिया प्रमूख संदिप मापारी, सुरज देशमुख, आंदोलन समिती प्रमुख मुबारक खान, गजानन काळुसे, आरोग्य समिती प्रमुख संतोष मालोसे, महेंद्र मिश्रा,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती योगेश शर्मा, गौरव खरे यांची निवड केली. जिल्हा प्रवक्तापदी – अमोल गावंडे, श्रीधर ढगे पाटील, संदिप शुक्ला, गणेश सोळंकी, इश्वरसिंग ठाकुर, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी – मोहम्मद फारुक,अमोल सराफ ,विनोद वानखडे,सिद्धार्थ गावंडे,सागर झनके, संजय दांडगे, देवानंद सानप, किशोर सोनोने, सुनिल मोरे, विजय हिवराळे, शिवाजी भोसले, जका खान, कुणाल देशपांडे यांची निवड केली आहे. तालुका समन्वयक पदी – शेगाव – राजवर्धन शेगावकर , संग्रामपुर – शाम वाघ, जळगाव – जामोद गणेश गिर्हे , नांदुरा – संतोष तायडे , मलकापुर – समाधान सुरवाडे , मोताळा – गोपाल काटे, बुलडाणा – निलेश राऊत, चिखली – संदिप सावळे, देऊळगाव राजा – विलास जगताप, सिंदखेडराजा – महेंद्र मोरे, लोणार – सागर पनाड, मेहकर – रमेश चव्हाण, खामगाव – निखिल शहा. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अनिल भगत,शिवदास सोनोने,गणेश भड, विलास बोडखे,आदेश कांडेलकर, गोपाल अवचार ,शिवाजी भोसले,राहुल गवई यांच्यासह आदींची उपस्थिती होती अशी माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील यांनी दिली.

Related posts

सिल्व्हरसिटी रूग्णालयाचा वर्धापन दिन रक्तदान करून साजरा

nirbhid swarajya

वीज पडून एकाचा मृत्यु तर; एक जण गंभीर जखमी

nirbhid swarajya

खामगावात जनता कर्फ्यू १०० % यशस्वी.. आ.आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद

nirbhid swarajya
error: Content is protected !!