कोरोना शी लढतांना सुरक्षिततेची घेतली शपथ
बुलडाणा : कोरोनापासून खबरदारी म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माझे आरोग्य माझी जबाबदारी म्हणून मीच माझा रक्षक सुचवलेल्या या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे आपले कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. त्यांचे मनोबल आणि धैर्य वाढावे या दृष्टीने बुलडाणा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यानी आपल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सोबत ‘मीच माझा रक्षक’ बाबत शपथ घेतली.यावेळी स्वतः जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना माझे आरोग्य माझी जबाबदारी म्हणून शपथ दिली.
कोरोनाचा थैमान वाढविण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे, कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी 21 दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे ,घराबाहेर पडू नये, जमाव होवू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या साठीच अहोरात्र सेवा देणारे पोलीस सुरक्षित राहवेत यासाठी माझे आरोग्य माझी जबाबदारी म्हणून मीच माझा रक्षक अशी संकल्पना आरोग्य मंत्री टोपे यांनी सुचवल्या आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी मीच माझा रक्षक बाबत शपथ दिली. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये अशी शपथ दिले जाणार आहे.म्हणून कर्तव्यावर असणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढणार आहे.