नांदुरा आणि खामगावात सापडले रुग्ण;सर्व रुग्णांना बाहेरची हिस्ट्री
खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा आता हळूहळू पणे वाढतोय… मागील आठवडाभरापासून २४ वर थांबलेली संख्या बुधवारी रात्री ३५ वर पोहचली आहे. नांदुऱ्या तालुक्यातील अलमपूर या गावात खामगाव तालुक्यातील जळका भडंग या गावात एक तर खामगाव शहरातील गोपाळ नगर भागात एक असे एकूण ३ रुगणांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवाल पैकी काल बुधवारी दिवसभरात ०५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अलमपूर ता. नांदुरा येथील १९ वर्षीय तरुण, जळका भडंग ता. खामगाव येथील २५ वर्षीय तरुण आणि लासूरा उमरा या गावाचा तर गोपाळ नगर येथे नातेवाईकाच्या घरी राहत असलेला ७० वर्षीय वृद्धाच्या अहवालाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३५ कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत २४ कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २४ आहे. सद्या रूग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहे,तर सर्व परिसर सील करण्यात आला आहे