बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात तब्बल १३
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यापैकी १२ रुग्ण खामगाव, नांदुरा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील असून, एक रुग्ण सुलतानपूर येथील आहे. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १८३ वर पोहोचली आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २८ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल निगेटिव्ह आले असून, १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये
लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील ४२ वर्षीय महिला, मलकापूरमधील काळीपुरा भागातील वृद्ध व्यक्ती, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील एक जण,
शेगावातील शादीखाना येथील ६० वर्षीय पुरुष, तसेच याच तालुक्यातील आळसना येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. या व्यतिरिक्त खामगावातील २७
वर्षीय महिला, अकोला येथील रामदास पेठमधून आलेला २० वर्षीय तरुण, आठ व १२ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर नांदुरा येथील दहा आणि १२ आणि १३ वर्षीय मुलगी व एका २४ वर्षाच्या
युवकाचा यात समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यक्ती आयसोलेशनमध्येच होत्या. शुक्रवारी तीन कोरोनाबाधित व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना वैद्यकीय संकेतानुसार
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये जळगाव जामोद येथील एक,मलकापूरमधील भीमनगरमध्ये राहणारा एक युवक व मलकापूर येथीलच ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
previous post