November 20, 2025
आरोग्य बातम्या बुलडाणा

जिल्ह्यातील होम क्वारंटाईनच्या संख्येत तीन जणांची वाढ

जिल्ह्यातील 64 नागरिक घरीच निरीक्षणाखाली


बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील 64 नागरिक त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणात ठेवण्यात आलेले आहे.घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये तीन नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 25 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या  भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 26 मार्च 2020 रोजी 3 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 64 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.     

जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अजून रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जिल्हयात आतापर्यंत 84 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 02 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.

Related posts

अवैध अग्निशस्त्र विक्री करणारा अटकेत ; 5 पिस्टल जप्त

nirbhid swarajya

बुलडाणा पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन

nirbhid swarajya

शिवसेना शहरप्रमुख विजय इंगळे यांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या कृत्याचा व आमदाराच्या वक्तव्याचा जाहीर निषेध…

nirbhid swarajya
error: Content is protected !!