बुलडाणा : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. वानखेड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुुुले अनेक नदीनाल्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर आता कमी जरी झाला असला तरी अनेक गावांत सध्या पूरस्थिती निर्माण झालीये तर काही गावांत विजेचा पुरवठा खंडित झाला असून या पावसामुळे हजारो हेकटरवरील पेरणीचे नुकसान झालं आहे, त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्याच्या स्थितीत वान नदीवरील पुलावरून पाणी असलायने इथली वाहतूकही विस्कळीत झालीये तसेच बुलडाणा वरवट बकाल येथील अतिवृष्टी मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धान्य चे नुकसान झाले आहे. संग्रामपूर कृषी
उत्पन्न बाजार समितीचे सभापती घटनास्थळी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सदर नुकसान लाखोंच्या घरात असून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.
previous post