जळगांव जामोद : आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी श्री राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून अनेक नेत्यांनी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. माञ
बुलडाणा जिल्हात श्रीराम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार कलम 37 अन्वये अधिसूचना व कलम 37 अन्वये आदेश जारी करण्यात आला आहे.
यामुळे जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ संजय कुटे यांनी प्रशासना निषेधार्थ आपल्या फेसबूक अकाऊंट वर पोस्ट टाकत बुधवारी दिवाळी साजरी करणार म्हणजे करणार अशी पोस्ट केली आहे.