October 6, 2025
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर मोताळा लोणार विदर्भ शिक्षण शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक

बुलडाणा जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत…

जिल्हाध्यक्षपदी गोपाल तुपकर सचिव संजय जाधव तर कार्याध्यक्ष कासिम शेख….

खामगाव – पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 14 वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला, यावेळी असोसिएशन ची नविन कार्यकारणी करीता असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे सल्लागार जितेंद्र कायस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी गोपाल तुपकर, सचिव पदी संजय जाधव, तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी कासिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली.तर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – जिल्हा उपाध्यक्ष फहीम देशमुख, संदीप शुक्ला जिल्हा समन्वयक संजय दांडगे, गणेश सवडतकर, जिल्हा संघटक जका खान, नितीन पाटील, कोषाध्यक्ष प्रफुल खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमूख संदीप वानखडे, सागर झणके. सोशल मिडिया प्रमूख निलेश राऊत, संतोष तायडे, आंदोलन समिती प्रमुख दीपक मोरे, समाधान सुरवाडे, आरोग्य समिती प्रमुख संदीप सावजी, सुनील मोरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राजीव वाढे, युवराज वाघ. जिल्हा सहसचिव राजवर्धन शेगावकर,देविदास खनपटे.जिल्हा प्रवक्तापदी – राहुल खंडारे, अमोल गावंडे, गणेश सोळंकी, इश्वरसिंग ठाकुर, डॉ. संजय महाजन, मो. फारुक, अमोल सराफ ,जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी – वसीम शेख,सिध्दार्थ गावंडे, अनिल भगत, पुरुषोत्तम भातूरकर, गौरव खरे, उदयभान दांडगे, राजेश बिडवे, रहीम शाह, उद्धव फंगाळ, देवानंद सानप, गजानन मेहरे, प्रभू मांटे, मुबारक खान, हरी जुमळे तालुका समन्वयक पदी – शेगाव – समीर शेख, संग्रामपूर – दयालसिंग चव्हाण, जळगाव – जामोद राजेश बाठे, नांदुरा – निंबाजी बाजोडे, मलकापुर – स्वप्नील अकोटकर, मोताळा – शिवाजी मामलकर, बुलडाणा – पवन सोनारे, चिखली – योगेश शर्मा, देऊळगाव राजा – प्रभू खांडेभराड, सिंदखेडराजा – गजानन काळूसे, लोणार – संदीप मापारी, मेहकर – संतोष मलोसे, खामगाव – शिवाजी भोसले. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी विठ्ठल भातुरकर, अशोक टाकळकर, नागेश भटकर, गणेश भड, शिवदास सोनोने, सचिन बोहरपी, सूरज देशमुख, विनायक देशमुख, कृष्णा जवंजाळ, विनोद वानखडे, विजय हिवराळे, रामेश्वर गायकी, इसरार देशमुख, अजय राजगुरे, महेंद्र बनसोड यासह संघटनेचे असंख्य पत्रकार सदस्य उपस्थित होते अशी माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख संदीप वानखडे यांनी दिली.

Related posts

तहसिलदारा यानी हातात तिफन घेत तलाठी,मंडळधिकारीसह केली शेतात जाऊन पेरणी…!

nirbhid swarajya

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह

nirbhid swarajya

दबावाखाली येऊन इसमाची विष घेऊन आत्महत्या; तिघां विरुद्ध गुन्हा दाखल..

nirbhid swarajya
error: Content is protected !!