शेवटच्या तीन रुग्णांना दुरुस्त करून दिला डिस्चार्ज
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील राहिलेल्या तीन कोरोना पॉझिटिव रुग्णांना दुरुस्त करून आज या तीनही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे बुलडाणा जिल्हा आता तरी कोरोना मुक्त झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता तर तेवीस रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी वीस रुग्णांना दुरुस्त करून या आधी डिस्चार्ज देण्यात आला होता तर आज उर्वरित तीन रुग्णांना देखील टाळ्या वाजवत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे हे तीनही रुग्ण नागपूर येथील होते,
तर दुसरीकडे आज रोजी बुलडाणा जिल्हा पूर्ण मुक्त झाला असला तरी राज्यातील आणि देशातील कोरोना चे गांभीर्य कमी झालेले नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.