परत पाच रुग्णांनी मिळवला कोरोना वर विजय
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे आज परत पाच रुग्णांनी कोरोना वर विजय मिळवला आहे, उपचार घेतल्या नंतर या पाच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत , त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यामधील एकाच मृत्यू झाला होता तर २० रुगणांवर जिल्हा स्त्री रुग्णालयातील आयसोल्युशन वॉर्ड मध्ये उपचार सुरू होते त्यापैकी १७ एप्रिल रोजी तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती तर आज परत पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना देखील टाळ्या वाजवत निरोप देण्यात आला. आज रोजी जिल्ह्यात १२ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत , सुटी देण्यात आलेले हे पाच रुग्ण दिल्ली मरकज वरून आल्याने त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, हे रुग्ण खामगाव मधील चितोडा येथील १ , शेगाव १, सिंदखेड राजा मधील १, देऊळगाव राजा मधील १ तर चिखली मधील १ येथील आहेत,तर खऱ्या अर्थाने या रुगणांवर दिवसरात्र उपचार करून आज रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे पाहत आरोग्य कर्मचाऱ्यांना युद्ध जिंकल्यासारखे आणि मेहनतीचे चीज होत असल्याच्या भावना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.