बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आता २१ वरपोहोचली आहे. आज १४ एप्रिल रोजी चार नमुने पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये बुलडाण्यातील १ व मलकापूर मधील ३ रुग्णांचा समावेश असल्यामुळे जिल्ह्याची चिंता आता वाढली आहे. मलकापूरयेथे दहा एप्रिल रोजी एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळला होता.त्याच्या संपर्कातील आणखी तीन जण पॉझीटीव्ह आले असल्याचीमाहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे. हे पॉझीटीव्ह आलेले ३ ही जण मलकापुरमधील रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील आहेत. तर उर्वरित १ बुलडाण्यातील आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पोझिटीव्ह व्यक्तींची संख्या ही आता २१ झाली आहे.
previous post