बुलढाणा: इंग्रज यांनी थंड हेवेचे ठिकाण म्हणून जिल्हाचे मुख्यालय निवळले भिलठानाचे कालांतराने नामकरण झाले.मात्र ते बुलडाणा की बुलढाणा यावरून अजूनही चर्चा होते.मात्र ते अधिकृतरित्या बुलढाणाच आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याचे नाव बुलडाणा ऐवजी बुलढाणा असे असणार,जिल्ह्याच्या गॅझेट मध्ये जिल्हा मुख्यालयाचा बुलढाणा असाच उल्लेख आहे.अनेकदा शासकीय व्यवहार मध्ये ‘ढा’ च वापरला जातो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी कार्यालया रंगरंगोटी करण्यात येत आहे.ध्वजारोहणच्या जागे नजीक ‘संविधान’ची कोनशीला बसविण्यात आली आहे.आता मुख्य प्रवेशद्वारावर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा असा बदल करण्यात आला आहे.यामुळे चर्चा केली असता,गॅझेट मध्येही बुलढाणा असा उल्लेख असल्याचे प्रसाशकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे किंचित बदल झाल्याचे सांगून,आता अनेक पत्रव्यवहारामध्ये बुलढाणा असा उल्लेख करण्यात येत असल्याचे या स्पष्ट झाले.
अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर मोताळा विदर्भ शेगांव संग्रामपूर