January 4, 2025
क्रीडा जिल्हा बातम्या बुलडाणा विदर्भ सामाजिक

बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सून मॅरेथॉन 9 ऑक्टोबरला….

बुलढाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या बोथा फॉरेस्टचा अर्थात ज्ञानगंगा अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसार आणि प्रचार होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळावी व आरोग्याच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी बुलडाणा अर्बनच्या वतीने बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बुलडाणा अर्बन,ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर गृप आणि बुलडाणा सायकलिंग गृपच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ऑक्टोबर रोजी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत १००० ते १५०० स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे अशी माहिती बुलडाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी आज १८ सप्टेंबर २०२२ रोजी येथे पत्रकार परिषदेत दिली.येथील बुलडाणा अर्बन रेसिडेंसीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेला ॲड. राखोंडे, नितीन चौधरी व महिला प्रतिनिधी डॉ. जाधव उपस्थित होत्या. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेच्या अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी शर्टचे विमोचन करण्यात आले. या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक ॲड. शरद राखोंडे यांनी केले स्पर्धेत संदर्भातील सविस्तर माहिती डॉ. झंवर यांनी दिली. ही स्पर्धा २१ कि.मी.ची अर्ध मॅरेथॉन, तसेच १० कि.मी., ५ कि.मी.आणि ३, कि.मी.अशा होणार असून बोथा फॉरेस्ट मधील नक्षत्रबन ते बोरखेड फाटा असा साडेदहा कि.मी. नितीन चौधरी व सिद्धी डिडोळकरचा सत्कार बुलडाण्याच्या आयर्न मॅन म्हणून ओळखले जाणारे आणि नुकतीच दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वात जुनी मॅरेथॉन म्हणून ओळख असलेल्या कॉमरेड ही ९० किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणारे नितीन चौधरी आणि बुलडाणा येथील उदयोन्मुख लॉन्ग रनर असलेली सिद्धी डिडोळकर हिचा बुलडाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर तथा बुलडाणा अर्बन मॅरेथॉन स्पर्धेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर हस्ते सत्कार करण्यात आला.

Related posts

खाजगी कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेवर सुरू करण्याची मागणी

nirbhid swarajya

घरकुलासाठी पारखेड येथील महिलांचा गट विकास अधिकारीनां घेराव..

nirbhid swarajya

देशविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचून देशाला बळकट करा- सागर फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!