खामगांव : अकोला वन्यजीव विभागा अंतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्यात 7 मे बुध्द पौर्णिमेच्या प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. यावर्षी वन कर्मचाऱ्यांना 963 वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याचे माहिती देण्यात आली आहे.
यावर्षी अभयारण्यात प्राण्यांसाठी 45 पाणवठे तयार करण्यात आले होते. मात्र कर्मचारी कमी असल्यामुळे 20 मचानांची उभारणी करण्यात आली. यावर्षी मात्र कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. त्यामुळे पर्यटकांना येथे येण्यास मनाई केली होती. पर्यटकांमधे कोरोना आजाराच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना आजारामुळे विविध जिल्ह्यांच्या सीमाबंदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यांमधील अभयारण्यांमधे निसर्गप्रेमी,वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी अभ्यासक पोहचू शकणार नाही, मचानांद्वारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यानी प्राणी बघत निसर्ग अनुभूती घेतली. अशी माहिती संतोष डांगे यांनी दिली. अमरावतीचे रेड्डी विभागीय वन अधिकारी खैरनार यांच्या मार्गदर्शनात खामगावचे वन परीक्षेत्र अधिकारी संतोष डांगे यांच्यासह आडो वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
असे झाले ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणी दर्शन!
सन 2020 या वर्षात वन विभागाच्या निरिक्षणानुसार वाघ – 01, बिबटे – 08, रान डुक्कर – 352,
बारकिंग डिअर (भेडकी) – 26, निलगाय – 213,
मोर – 122, तडस – 03, माकड – 143,सायळ – 05,
अस्वल – 12,चिंकारा – 14 ,ससा – 13 ,मुंगूस – 01,
रानमांजर – 04 ,हरियल पक्षी – 03 ,गरुड – 04,
घार – 03 ,घुबड – 01,चितळ – 18, सांबर – 16,
अनोळखी प्राणी – 01 या प्रमाणे वन्य प्राण्यांचे दर्शन झाले. सन 2019 मध्ये 982 वन्य प्राणी आढळून आले होते. यावर्षी ही संख्या 963 वर आली आहे.