श्री.तानाजी व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची सर्वत्र चर्चा
खामगाव : श्री. तानाजी व्यायाम शाळेचे कार्यकर्ते अभिषेक नारायण वाघ व आकाश डाबेराव यांची सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये निवड झाल्याबद्दल श्री. तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत व अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी श्री. तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने व्यायाम शाळेचे सचिव ओंकार आप्पाजी तोडकर व प्रविण कदम यांनी केडीया टर्निंग येथे देशसेवेत सामील झाल्याबद्दल अभिषेक व आकाश यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना घोड्या वर बसवून मिरवणूक काढली.यानंतर तानाजी व्यायाम शाळेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी डीजे च्या निनादात देशभक्तीपर गीत वाजवून वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आप्पाज़ी तोड़कर यांनी छत्रपतींच्या अश्वरुढ पुतळ्याला मालार्पण करुन अभिवादन केले, त्यानंतर व्यायाम शाळेतील नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुतळ्याला दोन्ही स्वागत मूर्तींच्या हस्ते मालार्पण करण्यात आले.यानंतर सर्व कार्यकर्ते दत्त मंदिर नवाफैल येथे अभीषेक चे निवास स्थानी वडील नारायण वाघ यांना आप्पाजी यांचे हस्ते हार घालुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी सर्व कार्यकर्त्यानी अभिषेक वाघ व आकाश डाबेराव यांचे स्वागत करून पुढील देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.सर्व कार्यक्रम ओंकार आप्पाजी तोडकर यांचे मार्गदर्शनात व प्रसाद तोडकर यांचे उत्कृष्ठ नियोजनात पार पडला.याप्रसंगी व्यायाम शाळेचे सचिव ओंकारआप्पाजी तोडकर, प्रवीणभा कदम, लता ताई गरड, वैशाली ताई काकडे, वाघ मावशि, राजुभाऊ मुळीक, श्याम आंबेकर, शैलेश सोले, रवी चोथवे,संजय शिंदे,आकाश खरपाडे, गजानन मुळीक, प्रणव माने, गौरव गरड़,कुनाल, गलांडे,अमित माने,आनंद पवार, सोमेश शिंदे,सागर मोरे, सागर बेटवाल, निखिल घाड़गे.यांच्यासह श्री. तानाजी व्यायाम शाळेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करन्या करिता राज पवार,पवन जमदुरकर, अमोल बडदकर, योगेश बिंगले, रोशन गवई आदिनी परिश्रम घेतले अशी माहिती शुभम वाघ यांनी दिली..