खामगाव : येथून जवळ असलेल्या वाडी येथील ग्रामसेवकाला ६० हजाराची लाच घेतल्या प्रकरणी अँटी करप्शन विभागाने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गारडगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील एका रोडचे काम पूर्ण केले होते. मागील झालेल्या त्या कामाचे ३ लाखाचे बिल काढण्याकरता ग्रामसेवक अभिषेक हिवाळे याने त्या सदस्याला ९० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यावेळेस ९० हजार रुपये देण्यास ग्रामपंचायत सदस्य तयार नव्हते. त्या ग्रामपंचायत सदस्य याने त्यांना अनेक वेळा बिल काढण्यासाठी तगादा लावला. मात्र या ना त्या कारणावरून किंवा त्रुटी काढून सदर ग्रामसेवक हा बिल काढण्याकरिता टाळाटाळ करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून माजी ग्रामपंचायत सदस्य ने तडजोडी आणि ६० हजार रुपये देण्याचे कबूल केले. मात्र ग्रामसेवकाने बिल काढल्यानंतर ६० हजार रुपये परस्पर स्वतः च्या खात्यामध्ये वळते करून घेतले. या प्रकरणाची माहिती पडताच सदर माजी ग्रामपंचायत सदस्याने बुलढाणा येथील लाचलुचपत विभागाला याची तक्रार केली. चौकशी करून ग्रामसेवक अभिषेक हिवाळे याला बुलडाणा येथील लाच लुचपत विभागाने पुराव्यासह त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे ग्रामसेवक अभिषेक हिवाळे हा नुकताच वाडी ग्रामपंचायत रूजु झाला आहे. तसेच त्याच्याकडे अन्य दोन गावाचा सुद्धा पदभार होता.
previous post