संग्रामपूर तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस.
संग्रामपूर:तालुक्यात मेघ गर्जनेसह विजांचा गडगडाट होवून तुरळक प्रमाणात पाऊस होवून बावनबीर येथे जि.प.सदस्या माजी मिनाक्षी हागे यांच्या राहत्या घरावर स्पर्श करुन विज कोसळली.यामध्ये घराचे टाॕवरचे नुकसान झाले मात्र जिवीत हानी टळली.याचवेळी विद्युत डि.पी.वर शाॕट सर्कीट होवून विद्युत बंद पडला होता.संग्रामपूर तालुक्यात दि.१८ जून रोजी रात्री १२ वा.च्या सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह विजांचा गडागडाट सुरु होता.तालुक्यात संग्रामपूर शहरासह काही भागात तुरळक प्रमाणात चांगलाच पाऊस झाला.त्या दरम्यान बावनबीर येथील जि.प.च्या माजी सदस्या सौ.मिनाक्षी सुरेश हागे यांच्या राहत्या घराचे टाॕवरला विजेचा स्पर्श होवुन विज कोसळली इमारतीचे नुकसान झाले परंतु जिवीत हानी टळली.याच वेळी विद्युत डिपीवर शाॕट सर्कीट होवून विज पुरवठा बंद पडला होता.