January 4, 2025
चिखली जिल्हा बुलडाणा शिक्षण

बारावीत ७९% टक्के मिळवूनही विद्यार्थ्याची आत्महत्या

इंग्रजीत कमी मार्क मिळाल्याने मानसिक तणावातून केली आत्महत्या..

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कव्हळा येथे इयत्ता बारावीच्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे ५ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर युवकाचे नाव विनायक संतोष लांडे वय १८ वर्षे असून तो इयत्ता बारावी ला होता मात्र काल बारावीचा निकाल लागला असून विनायक ला ७९% एवढे गुण मिळाले होते परंतु विनायक हा इंग्रजी विषयात नेहमी अव्वल असायचा पण दिनांक 16 जुलै 2020 त्याला इंग्रजी विषयात केवळ ५६ टक्के मिळाले असल्याने आज विनायक पहाटे ५ वाजता घरातून कोणालाही न सांगता आपल्या शेतात निघून गेला व शेतातील आंब्या च्या झाडाला नायलॉन च्या दोरीने साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली व आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या बहिणीचा देखील पॉलिटेक्निक चा काही दिवसा आधी निकाल लागला असून तिला ८४% मिळाले आहेत अशी माहिती गावकऱ्यांनी व कुटुंबियांनी दिली आहे. पण विनायकला अपेक्षेप्रमाणे कुठल्याच विषयात मार्क्स मिळाले नसल्याचे त्याने आत्महत्या केली असेल अशी शंका त्याच्या शिक्षकाने व्यक्त केली आहे.

Related posts

जिल्ह्यात प्राप्त 181 कोरोना अहवाल निगेटीव्ह; 43 पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

प्राथमिक लक्षणे जाणवताच कोविड तपासणी करावी – उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव

nirbhid swarajya

राजपुताना ट्रॅव्हल्स च्या धडकेत वृद्धाचा मृत्यू , ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा दाखल…

nirbhid swarajya
error: Content is protected !!