अग्रवाल परिवार जपत आहे सामाजिक बांधीलकी
खामगांव : तहानलेल्याना घोटभर पाणी पिऊ घालने ही आपली 3संस्कृति आहे. म्हणूनच उन्हाळा आला की सामाजिक कार्याची भान ठेवून मधुबन परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्वखर्चाने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. बारादरी स्थित मधुबन चौकात गावातील व बाहेर गावातील येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांसाठी थंड व शुद्ध आर ओ च्या पिण्याच्या पाण्याचे पाणपोईचे उद्घाटन मधुसुदन अग्रवाल यांच्या हस्ते व लॉयन्स क्लब संस्कृतिचे अध्यक्ष सुरज अग्रवाल यांच्या उपस्थितित करण्यात आले. कोरोनासारख्या महामारिच्या काळात स्वछतेचे सर्व नियम पाळत शुद्ध व थंड पाण्याची पाणपोई मधुबन परिवारातर्फे उभारण्यात आल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. मधुबन परिवाराकडून त्यांचे प्रतिष्ठान अग्रवाल क्रोकरिज येथे कोरोना काळापासून येणाऱ्या ग्राहकांसाठी हाथ धुण्याची व्यवस्था सुद्धा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दर्शनसिंह ठाकुर,हरिसेठ वर्मा, सूरज मधुसूदन अग्रवाल, कविता अग्रवाल,तरुण अग्रवाल, अक्षदा अग्रवाल, लॉयन्स क्लब संस्कृतिचे संजय उमरकार, उज्वल गोयनका, अभय अग्रवाल,तसेच सर्व लॉयन्स क्लब पदाधिकारी व अग्रवाल क्रोकरिज चा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.