खामगाव : बाबूजी गोल्ड ऑइल इंडस्ट्रीज तर्फे उद्या भव्य बुद्धिबळ खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्नित बुलढाणा जिल्हा चे सर्कल बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात मोहन मार्केट खामगाव येथे स्पर्धा होणार आहे.२६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल. पहिल्या दहा विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व चषक त्याचप्रमाणे पंधरा वर्षाखालील बारा वर्षाखालील नऊ व सात वर्षाखालील, मुलींचा खुला गट उत्कृष्ट बुलढाणा जिल्हा खेळाडू वरिष्ठ खेळाडू ६० वर्षावरील या सर्व गटातील पहिल्या तीन खेळाडू यांना देखील रोख पारितोषिक प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मान करण्यात येईल. स्पर्धेचे स्वरूप जलदगती असून प्रत्येक खेळाडूस पंधरा मिनिटे व पाच सेकंदाचा वाढदिवस दिला जाणार आहे. या स्पर्धेत तब्बल २५ हजार रुपयांची भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी बुद्धिबळपटूना प्राप्त होणार आहे. या स्पर्धेस महाराष्ट्र मार्गदर्शक बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताळे हे लाभले आहेत तर स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून जळगाव येथील प्रवीण ठाकरे हे भूमिका निभावणार आहेत. तरी इच्छुक बुद्धिबळ पटूनी नोंदणी करिता ऋषिकेश लोखंडकार 9420497255 व अधिक माहिती करिता निनाद वरुडकर 9137674889 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.