भविष्यात काय होणार, कसं होणार… याची उत्सुकता प्रत्येकाला असते. बाबा वेंगा, नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्यांवर वादविवाद सुरूच असतात. दरम्यान, एका मुलीने 2022 वर्षासाठी 28 मोठे भाकीत केले होते, त्यापैकी 8 खरे ठरले आहेत. त्यामुळे या मुलीची तुलना बाबा वेंगा यांच्याशी केली जाते. 2022 साठी 19 वर्षीय हाना कॅरोलने केलेल्या मोठ्या भाकितांपैकी एक म्हणजे ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचं निधन होणार. आतापर्यंत हाना कॅरोलचे 10 भाकितं खरी ठरली. हॅरी स्टाइल्स आणि बेयॉन्स याचं नवं एल्बम, रिहानाची प्रेग्नेंसी आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा – निक जोनस यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन. तर दुसरीकडे कार्दशियन कुटुंबासाठी केलेल्या अनेक भाकितांमुळे कुटुंबाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत. नुकताच हाना कॅरोलने केलेली एक भविष्यवाणी खरी ठरली आहे. पॅट डेव्हिडसन आणि किम कार्दशियन वेगळे झाले तेव्हाच हानाचा एक अंदाज खरा ठरला. तिने किम आणि माजी पती कान्ये वेस्ट यांच्यातील नातेसंबंधात फूट पडण्याचा अंदाज देखील वर्तवला होता. तो देखील खरा ठरला. फॉक्सबोरो, मॅसॅच्युसेट्स, यूएस येथे राहणारी हाना म्हणते की तिचे अंदाज “धैर्यपूर्ण आत्म्यावर” आधारित आहेत. ती म्हणते, ‘जेव्हा मी केलेला कोणताही अंदाज खरा ठरतो, तेव्हा माझा उत्साह वाढतो. मी नेहमीच पॉप कल्चर आणि सेलिब्रिटींच्या मध्ये असते, त्यामुळे माझे अंदाज बहुतेक त्यांच्याबद्दल असतात.’ असं देखील हाना म्हणाली.