January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

बाप्परे… खामगावातील एका उद्योजकाकडून तब्बल पावणे दोनकोटींची कर चुकवेगिरी!

बनावट प्रतिज्ञापत्र सादर करणे अंगलट; उद्योजक नितीन टावरी यांच्या विरोधात गुन्हा

खामगाव: वस्तू व सेवा कर चुकविण्यासाठी एका उद्योजकाकडून बनावट प्रतिज्ञा पत्र, बोगस दस्तवेज आणि नकली कागदपत्रांचा आधार घेण्यात आल्याचे कटकारस्थान खामगावात उघड झाले. तब्बल एक कोटी, ७८ लाख  २१,३५५ रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणी अखेरीस एमआयडीसीतील देवकी अ‍ॅग्रोचे संचालक नितीन मोहनलाल टावरी यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानिमित्ताने डाळीवर कर आकारणारा देशातील पहिला ठराव खामगाव वस्तू व विक्री कर विभागाने पारीत केला. हे येथे उल्लेखनिय!
उद्योजकांकडून खामगाव कार्यालयात सादर प्रतिज्ञापत्राच्या सत्यता पडताळणीसाठी जीएसटी कार्यालयाकडून तहसीलदारांना २३ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्र देण्यात आले. पडताळणी दरम्यान प्रतिज्ञापत्रावरील बारकोड आणि प्रतिज्ञापत्राचा क्रमांक बनावट आढळूला आला. तसेच वस्तू व सेवाकर कार्यालयात  प्रमाणपत्र सादरीकरणाच्या स्थळप्रतीवरील कर सहायक यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आवक-जावक पुस्तिकेत कोणतीही नोंद आढळून आली नाही. कर चुकविण्यासाठी संबंधितांनी ठरवून गुन्हा केल्याचे खामगाव जीएसटी कार्यालयाच्या लेखा परिक्षणात आढळून आले. त्यामुळे त्यांना एडीटी-०२ व डीआरसी-०१ या दोन सांकेतिक नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर सर्व कारस्थान उघड झाल्याने करचुकवेगिरीचे मोठे घबाड समोर आले.

प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे निष्पन्न; विविध कलमान्वये गुन्हातब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर चुकविण्यासाठी ४ वर्षांपूर्वी उद्योजक नितीन टावरी यांच्याकडून खामगाव येथील जीएसटी कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पोच जोडली. प्रतिज्ञापत्र आणि पोचपावतीवरील कर्मचारी व अधिकाºयांच्या स्वाक्षरी खोट्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान कर बुडविण्यासाठी बनावट प्रतिज्ञापत्र व बोगस दस्तवेजांचे कारस्थान उघडकीस आल्याने टावरी यांच्या विरोधात शहर पोलिस स्टेशन खामगाव येथे भादंवि कलम ४६७, ४६८, ४६९ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

डाळीवर कर आकारणारा पहिला ठराव!डाळ उद्योगावर कर आकारणारा देशातील पहिला ठराव खामगाव जीएसटी कार्यालयात पारीत करण्यात आला. त्यानंतर जीएसटीचे विभागीय आयुक्त टी.जी.पाचरणे यांच्या परवानगीने सहा.आयुक्त डॉ.सी.के.राजपूत यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. थकीत असलेला एक कोटी ७५ लक्ष रुपयांचा वस्तू व सेवा कर केवळ सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांतील ९ महिने कालावधीचा असून उजोकांविरोधात जन्मठेपेची शिक्षा असलेल्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. त्यामुळे खामगावच्या उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Related posts

वरली मटक्यावर LCB पथकाचा छापा; ५ जण ताब्यात १ फरार

nirbhid swarajya

हनुमान सागर धरणातून पाण्याचा 64.85 घ. मी. से. विसर्ग, 4 वक्रद्वारे 50 से. मी. नी उघडले, नदीकाठच्या 14 गावांना सतर्कतेचा इशारा.

nirbhid swarajya

खामगांवात सीसीआय चे तीन खरेदी केंद्र सुरु

nirbhid swarajya
error: Content is protected !!