January 5, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेतकरी

बाजार समिती मधील २ व्यापारी नॉट रिचेबल

खामगांव : अडते यांच्याकडून लाखो रुपयांची तूर खरेदी करून त्याची रक्कम थकवणारे कृषी उत्पन्न बाजार समितीतील दोन तुर खरिददार नॉट रिचेबल झाले असल्याची चर्चा संपूर्ण बाजारात झाली आहे. त्यापैकी एक खरीददार पंधरा दिवसांपासून नॉटरिचेबल असून त्याने तोटा झाल्याचे सांगितले असून जमेल तसे पैसे देईल असे सांगून हात वर केल्याची चर्चा सुद्धा बाजार समितीमध्ये सुरू आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्या व व्यापाऱ्यांना अनेकांनी चुना लावला आहे. त्यामुळे ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती हात वर करणे विषयी नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी सोयाबीन खरेदीदाराने तर कधी धान्य खरेदी दाराने गंडवले आहे.

आता तुर खरीददार दोघे नॉटरिचेबल झाले आहे. यामध्ये एका तुर खरीददाराने अडत्या कडून वीस ते पंचवीस लाखांची तूर खरेदी केली आहे परंतु तोटा आल्याचे सांगून त्याने हात वर केले आहे. त्यामुळे त्याचा मोबाईल नॉटरिचेबल हे तर दुसर्‍या एका तूर खरी दाराने अडते कडून 40 ते 50 लाखांची दूर खरेदी केली आहे मात्र तो व्यापारी काल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होता, परंतु आज त्याचा मोबाईल क्रमांक नॉटरिचेबल आल्याने या दोन्ही तूर खरेदी खरीददार व्यापाराबद्दल नॉटरिचेबल ची चर्चा संपूर्ण बाजार समितीमध्ये रंगू लागली आहे. याबाबत बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Related posts

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

nirbhid swarajya

सोमठाणा येथील विषबाधेची परिस्थिती नियंत्रणात

nirbhid swarajya

वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर २७ जुलै रोजी खामगावात

nirbhid swarajya
error: Content is protected !!