खामगाव : बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संभाव्य प्रशासक मंडळाची यादी जाहीर झाली असून लवकरच प्रशासक मंडळ नियुक्त केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रशासक मंडळांमध्ये एकूण २४ नावे देण्यात आली आहे. यामध्ये अशोक हटकर ,धोंडीराम खंडारे गोपाळराव कोल्हे, पुरुषोत्तम देशमुख, भरत लाहुडकार, रेखा टिकार, समाधान मुंडे, दामोदर ताठे, सुधीर देशमुख, भगवान लाहुडकार, कृष्णा पाटील डॉ. सदानंद धनोकार, सुरेश तोमर,पिंटू टिकार, अमय सानंदा, पंजाबराव देशमुख,

सुभाष पेसोडे, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश वावगे, हरिदास हुरसाड, अनिल अमलकार, सुभाष वाकुडकर, गजानन मोरखडे, श्रीराम खेलदार, विष्णुदास कदम अशी २४ नावे प्रशासक मंडळात आहेत. ही यादी मोठी असून यापूर्वी १८ प्रशासन मंडळ नेमण्यात आले होते आता या २४ नावांपैकी किती नावे निश्चित होतात हे पाहावे लागणार आहे. २४ पैकी १८ नावे फायनल होतील, काँगेस, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी ६ तर मुख्य प्रशासक पदासाठी ज्ञानेश्वर दादा (नाना ) व अशोक हटकर ही नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेकमे प्रशासक पदी कोणाची वर्णी लागणार याचे खरे चित्र लवकरच समोर येईल.