गावातील प्रत्येक गरीब व गरजू नागरिकांना देणार मोफत जेवण
(कुणाल देशपांडे) २८ मार्च खामगाव : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनामार्फत करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोनाने हाहाकार माजवला असुन तर दुसरीकडे अस्मानि संकट सुद्धा शेतकऱ्यावर आले आहे. खामगांव तालुक्यातील अनेक खेडे गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील माल तसाच पडून आहे. हीच बाब लक्षात घेऊन खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिव यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित संचालक, अडते, हमाल संघटनेचे अध्यक्ष, यांची तातडीने बैठक घेऊन पुढील नियोजनाविषयी सविस्तर चर्चा केली.
यानंतर एक संचालक मंडळ उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा करुन आपले बैठकीतील निर्णय सांगितले व एक अंतिम बैठक 3 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे असेही सांगितले. या बैठकीमधे शेतकरी आपला माल बाजार समिति मधे कश्या पद्धतीने घेऊन येऊ शकतील व अडते, व्यापारी यांना आपला माल कसा विक्री करू शकतील व शेतकऱ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने क़ाय उपाययोजना करता येतील या सह विविध विषयावर चर्चा झाली. यानंतर खामगांव येथील बाजार समिति मधे येणाऱ्या शेतकऱ्यांना पहिले 1 रूपयात पोटभर जेवण मिळत होते तर आता येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना व गावातील गरीब व गरजु लोकांना मोफत जेवण देण्याचा निर्णय सुद्धा या वेळी घेतला आहे. त्याचप्रमाणे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने जीवनावश्यक वस्तू पुरविण्याकरिता आवश्यक मनुष्यबळ व वाहतूक यांचे नियोजन करणेबाबत सूचित करण्यात आल्याची माहिती सचिव भिसे यांनी दिली आहे. सदर बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष टाले, सचिव नटकूटराव भिसे, संचालक विठ्ठल लोखंडकार, अशोक हटकर, हमाल संघटनेचे अध्यक्ष राजेश हेलोडे उपस्थित होते.