विदर्भ – बुलडाणा : बहूप्रतिक्षित मान्सून अखेर विदर्भात दाखल झाला अशी घोषणा काल नागपूर वेधशाळेने केली आहे. बंगाल च्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काल (शुक्रवार) मान्सून पूर्व विदर्भ मार्गे दाखल झाला असून विदर्भातील वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर,बुलडाणा जिल्ह्यात काल मान्सून चे आगमन झाले आहे तसेच उद्यापर्यंत मान्सून हा संपूर्ण विदर्भासह राज्याच्या बऱ्याचशा भागात पोहचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मान्सून च्या आगमनासह पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतके जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यात देखील काल जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये काही भागात वृक्ष उन्मळून पडली आहेत तर कुठे पुल खचला आहे. मात्र उन्हाळ्यात वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
previous post