खामगांव : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा जवळ जवळील एका पुलावरून बस घसरण्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव आगार की बस क्रमांक एम एच-४०- एन- ८९२२ ही खामगाव वरून आलेगाव येथे जात असताना मधात लागणाऱ्या पुलावरून ही बस घसरली व पुलाच्या खाली जाऊन अर्धवट स्थितीत पलटी झाली होती गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाल्यांना पूर आला असून त्याचे पाणी या पुलावरून गेले होते. ही बस चालक वाहकासह चार प्रवासी घेऊन पुलाच्या खाली घसरली. या मधे सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पुलावर असलेल्या चिखलामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी वाहनचालकाची व प्रवाशांची मागणी आहे. यापुढे अपघात झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परिसरातील नागरिकानी दिला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिस व खामगाव आगारातील एसटी डेपो व्यवस्थापक पवार यांच्यासह एसटीचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले होते व क्रेनच्या सहाय्याने नाल्यात पडलेली बस काढण्यात आली.
previous post