एसटी बसचा रोड सुटल्याने बस रस्ता खाली उतरून बांधला जाऊन धडकल्याने धडकल्याने बसमधील 23 विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत तर तीन ते चार विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे बस मध्ये एकूण 45 पर्यंत प्रवासी होते,
मलकापूर आगाराची बस चिचखेडनाथ वरून मोताळा येथे जात असताना खामगाव तालुक्यातील कोथळी गावानजीक हा अपघात घडला जखमी विद्यार्थ्यांना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून बोराखडी पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत,बसचा अपघात होण्याच्या जिल्ह्यात घटना सुरूच असुन वारंवार भंगार बसचा अपघात होत असल्याने पुन्हा एकदा या घटनेने एसटी महामंडळाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.