मलकापुर : शासनाने वर्ग ८ ते १२ च्या शाळा सोमवार पासून चालू केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाच्या बसेस अद्यापही बंद आहेत. यामुळे खेड्या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना गैरसोय होत आहे. नियमित बसेस चालू करा याबाबत आज मलकापूर आगारात जावून आगार प्रमुख दराडे यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी आगार प्रमुख यांनी सांगितले की मुलांना पास काढण्यास सांगा मी त्वरित बसेस चालू करतो असे आश्वासन दिले. या वेळी निवेदन देते वेळी वसंतराव भोजने जि. प. सदस्य , शिवसेना मलकापूर तालुका प्रमुख विजय साठे ,शिवसेना मलकापूर शहर प्रमुख किशोर नवले,

विद्यार्थी सेना जिल्हा ऊप प्रमुख ईश्वर पांडव, विजय काळे,शहर उप प्रमुख उमेश हिरुळकर , शिवसेना नगरसेवक मलकापूर न.प. मा. राजू फुलोरकर, शिवसेना तालुका ऊप प्रमुख राजेशसिंह राजपूत, विनोद बोडदे, मयुर मंडवाले उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने असे सांगण्यात आले की वर्ग ८ ते १२ मधील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एसटी बसच्या पासेस तात्काळ काढाव्यात जेणेकरून एसटी बसेस लवकरात लवकर सुरु होईल.