December 26, 2024
जिल्हा बुलडाणा

बलात्कार करून फरार आरोपी 37 वर्षानंतर पकडला

घरमालकाच्या तरुण मुलीचे अपहरण करून 37 वर्षापूर्वी बुलडाण्यातून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केले आहे.
सन 1983 मध्ये आरोपी राजबहादुर नारायण कुशवाह हा बुलडाण्यातील एका परिसरात कामानिमित्त राहत होता, त्यावेळी आरोपी चे वय 22 वर्ष होते. ज्या खोलीत तो राहायचा त्याच घरमालकाच्या मुलीचे अपहरण करून तो पळून गेला होता. अपहरणानंतर त्याने पीडित तरुण मुली सोबत दुष्कर्म करून फरार झाला होता. त्याच्या विरोधात कलम 363, 376 अन्वये गुन्हा दाखल केला होता. कुशवाहा मूळचा उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील तालुका बिल्लोर, रा. चोरसा गदलपूर येथील राहणारा आहे. कुशवाह फरार झाल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशामध्ये जाऊन त्याचा तपास घेतला होता परंतु तो मिळून आला नाही. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विरोधात अजामीनपात्र (वॉरंट) बनवले होते तसेच त्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते. जवळपास 37 वर्षापासून फरार आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु एस.पी.डॉ. दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात एलसीबी चे पीआय. महेंद्र देशमुख यांनी हेकॉ. अताउल्ला खान , पोकॉ. नदीम शेख, केदार फाळके राजू आडवे यांचे विशेष पथक तयार केले व त्यास अटक केली.

Related posts

सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश ताठे काँग्रेसच्या वाटेवर ?

nirbhid swarajya

समता क्रिडा मंडळाची भिमजयंती उत्सव समितीची कार्यकारणी गठित

nirbhid swarajya

जिल्ह्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya
error: Content is protected !!