खामगांव : येथील बर्डे प्लॉट येथे एका घरातील अवैध रित्या साठवलेला गुटखा शिवाजी नगर पोलिसांना जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक बर्डे प्लॉट भागातील रहिवासी शेख शाकीर शे. रहीम (४२) याने आपल्या घरात शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी जीवितास धोकादायक असलेला तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला विक्री करण्यासाठी ठेवला आहे. अशी गोपनीय माहिती मिळाली होती. या मिळाल्यावरुन माहितीवरून शिवाजी नगर पोलिसांनी काल २६ मे २१ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शेख शाकीर शे. रहीम याचे घरी छापा मारला असता २ पोतड्यामध्ये विमल पान मसाला ६२ पुडे, विमल पान मसाला मोठी, व्हि-१ तंबाखु, असा एकुण १३ हजार ३८६ रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा मिळुन आला.
तर आरोपी शेख शाकीर फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी पीएसआय प्रकाश निनाजी सातव यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त आरोपीविरुध्द भादंवि कलम १८८,२७२,२७३ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(आयव्ही), शिक्षा पात्र कलम ५९(आय)नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विजय उगले करीत आहेत.