खामगांव : शहरातील बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील आरोपी तसेच हॉटेल व्यवसायिक प्रदीप राठी याच्यावर नकली मुद्रांक बनावट दस्तऐवजाद्वारे खरेदीखत नोंदवून भूखंड घोटाळा केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल झाले आहे. बनावट मुद्रांक करून प्लॉट खरेदी प्रकरणी प्रदीप राठी याचा जामीन कोर्टाने नामंजूर केला आहे. गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून प्रदीप राठी हा फरार होता मात्र काही दिवसांपूर्वी खामगाव येथे खरेदी कामासाठी आला असता त्या माहितीच्या आधारे बुलढाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळण्यासाठी त्याने याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती मात्र ती फेटाळण्यात आली होती. टेंभूर्णा शिवारातील १४ प्लॉटसाठी स्वतःच्या घरी नकली मुद्रांक तयार करणे त्याद्वारे बनावट व खोटे दस्तावेज तयार करणे विविध शासकीय अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के सह्या करून खरेदी खत नोंदवून १ कोटी ६४ लाख रुपयांची प्रदीप राठी यांनी फसवणूक केल्याची तक्रार अंजू लवकेश सोनी यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. सोनि यांचे पती लोकेश सोनियांचा २००७ मध्ये मृत्यू झाला.मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांनी १४ डिसेंबर २००० मध्ये वल्लभदास राठी यांच्याकडून टेंभूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २४ मधील दहा प्लॉट विकत घेतले होते. लवकेश सोनी यांच्या निधनानंतर प्रदीप राठी यांनी २००७ ते २०२१ दरम्यान लवकेश सोनी यांच्या नावावर असलेले टेंभुर्णा शिवारातील १४ प्लॉट बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री केली. त्याद्वारे १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची श्रीमती सोनि यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर गुन्हा हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला त्यावेळी राठी यांनी खामगाव येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तो सुद्धा फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम जामीनासाठी अर्ज केला मात्र तो सुद्धा फेटाळण्यात आला होता. प्रदीप प्रेमसुखदास राठी यांच्या विरोधात व खामगाव लँड डेव्हलपर्स व अनेक लोकांना एक प्लॉट दोन लोकांना विकल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. प्रदीप राठी मागील ३८ दिवसांपासून जेलमध्ये असून त्यांचा जामीन अर्ज आज कोर्टाने नाकारला आहे. या प्रकणांत आणखी मोठी नावे व सर्व गुन्हेगार पुढे येण्याची दाट शक्यता आहे.
previous post
next post