आघाडीने बिघडवला विदर्भाचा विकासाचा आलेख !
खामगांव: राज्यात आघाडी सरकारचे सरकार आले आणि संपुर्ण राज्याच्या विकासाला खिळ बसली. हया अर्थसंकल्पात विदर्भाच्या विकासासाठी भरपूर निधी मिळेल ही अपेक्षा असतांना केवळ खानापुर्ती करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे नांव राज्यातील अर्थसंकल्पात घेतलेले दिसते. पेट्रोल डीजल वरील राज्याच्या करात कोणतीही कपात केली नाही त्यामुळे सर्वसामन्य़ नागरीकांना न्याय देण्याच्या गप्प़ा करणाऱ्या सरकारने सर्वसामान्यांना कोणताही दिलासा दिला नाही. वीज दरवाढीत देखील कोणतीही सवलत दिली नाही. हा विदर्भासह संपुर्ण राज्यासाठी निराशाजनक असा अर्थसकल्प् आहे, असे विधान आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केला आहे.राज्यभरातील सर्व निधी पश्चिम महाराष्ट्राला पळविल्याची जुनीच परंपरा आघाडी सरकारने पुन्हा सुरु केली असून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात विदर्भ,मराठवाडा व उत्त़र महाराष्ट्राची नावे केवळ खानापुर्ती करण्यासाठी असल्याचे स्पष्ट़ झाले आहे. पेट्रोल व डीजल दरवाढीसाठी ओरडणारे मोर्चे काढणारी सत्ताधारी स्व़त: मात्र राज्यात अवाजवी व भरघोस कर आकारुन सर्व सामान्य नागरीक व शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत आहे. वीज दरवाढी बाबत ठोस निर्णय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल व दरवाढीमुळे आर्थीक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अर्थसंकल्पातील सर्व शिर्षकाखालील निधी फक्त़ पश्चिम महाराष्ट्रासाठी वळविण्यात आला असून हा राज्याचा अर्थ संकल्प़ नसुन पश्चिम महाराष्ट्राचा अर्थ संकल्प़ आहे की काय अस वाटते. सर्व अर्थाने हा अर्थसंकल्प़ निराशाजनक आहे. बुलढाणा जिल्हयात घाटाखालील विशेषत: भाजपाच्या मतदार संघात कोणताही निधी देण्यात आला नाही. हया मतदार संघात देखील नागरीक राहतात ते हया राज्याचे देशाचे नागरीक आहेत. त्यांना निधी न पुरविल्यामुळे हे मतदार संघ नागरीक सुविधेपासून वंचीत राहून हयाचा सर्व त्रास हया मतदार संघातील नागरीकांना होणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हयासाठी हया अर्थसंकल्पात काहीच नसून हा पुर्ण निराशाजन अर्थ संकल्प़ आहे.