April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

बकऱ्या चारताना वाहून गेलेल्या तिघांनपैकी अजून एकाचा मृतदेह सापडला

खामगाव : तालुक्यातील माक्ता कोफ्ता येथील बोर्डी नदीकाठी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या बाप लेकासह अजून एक जण वाहून गेल्याची घटना काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली होती. यामध्ये दिलीप नामदेव कळसकर वय 42 याचा मृतदेह दुपारी शोधला असता गावाजवळ मिळून आला. तर त्यामधील गजानन लहानु रणशिंगे वय 38 व मुलगा राहुल गजानन रणसिंगे वय 16 हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. काल पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत शोध घेतला, मात्र ते दोघं मिळून आले नाही. आज 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास जलंब पोलिस स्टेशन हद्दितील मोरगाव येथील नदीपात्रात गजानन रणसिंगे यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना गावातील नागरिकांना दिसून आला. तात्काळ नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला वमाहिती पोलिसांना कळवली, घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदनात पाठवण्यात आले होते. गजानन रणसिंगे यांचा मुलगा राहुल रणसिंगे याचा शोध घेण्याचे काम अजुनही सुरु आहे.या काल घडलेल्या दुःखद घटनेमुळे माक्ता शिवारात शोककळा पसरली आहे.

Related posts

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन’ मोड मध्ये

nirbhid swarajya

शेलोडी येथे घरफोडी

nirbhid swarajya

२५ लाखाचा जॅकपॉट लागला असे सांगून १ लाख रूपयाने फसवणूक

nirbhid swarajya
error: Content is protected !!