खामगांव : येथील तलाव रोड वरील दि. बुलढाणा केंद्रीय सहकारी बँक कॉटन मार्केट शाखा येथे चोरीचा प्रयत्न फसला. मिळालेल्या महितीनुसार आज सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान वॉचमन विजय जेवे वय ६० रा. बाळापूर फैल हे आज सकाळी बँक उघडण्याकरता गेले असता बँकेच्या मागील दरवाजा तोडलेला दिसला. यावेळी त्यांनी तात्काळ बँकेतील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली त्यानंतर बँकेचे कर्मचारी हे बँकेत आले असता त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली. शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. बँकेमधे चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे बँकेचे विभागीय विकास अधिकारी संतोष कुमार गिरी हे शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते. वृत्त लिहेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.