खामगाव : सोशल मीडियावर आज सकाळ पासुन वारी हनुमान येथे 5 युवकांचा डोहात बुडून मृत्यु झाल्याची फोटोसह पोस्ट व्हायरल होत आहे, यामध्ये काही नेटकऱ्यांनी देखील ही पोस्ट व्हायरल केली आहे त्यामुळे याबाबताचे वायरल फॅक्ट चेक निर्भिड स्वराज्यने केले असता असे निदर्शनास आले की सदर घटना ही 2 जुलै रोजी मुंबई जवळील जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधबा येथे घडली आहे. काळमांडवी धबधब्यावर ११ ते १२ युवक पोहोण्यासाठी गेली होती. मात्र, त्यातील पाच युवकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यामुळे अशी कुठलीही घटना अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान येथे घडली नाही व या घटनेचा वारी हनुमान यांच्याशी काहीही संबंध नाही असे निर्भिड स्वराज्य च्या व्हायरल फॅक्ट चेक मध्ये समोर आले आहे.