खामगांव / शेगांव : कोरोना विषाणूमुळे अख्या जगावर मोठे संकट ओढवले आहे. या विषाणूने अनेकांच्या हातचा घास हिरावला तर अनेक हातांना बेरोजगारही केले तसेच अनेकांच्या मुहूर्तावर पाणीही फिरवलं मात्र या अशा परिस्थितीतही काही विवाह होत आहेत व यातीलच काही विवाह समाजासमोर आदर्शही ठेऊन जात आहेत.
सुरेश ठाकरे यांचा मुलगा नितेश राहणार सुजातपूर ता खामगाव हल्ली मुकाम सुटाळा खुर्द व उद्धव सुलताने यांची मुलगी पूजा राहणार बेलुरा माटरगाव ता शेगाव हल्ली मुकाम जळगाव खा. यांचा विवाह सोहळा आज दिनांक २३ मे रोजी कुऱ्हा काकोडा मुक्ताईनगर येथे २० पाहुण्यांच्या उपस्थितीत फीजिकल डीस्टंसिंग पाळत तसेच या वधू व वराने मास्क लावूनच विवाहाच्या ठिकाणी प्रवेश केला, अश्या प्रकारे हा विवाह सोहळा पार पडला.
विषाणूमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. अशा प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा घरात विचार केला. याला घरातील सर्वांनी दुजोरा दिला.
या आदर्श विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोना