November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा सामाजिक

फरशी मित्र मंडळातर्फे रक्तविरांनी रक्तदान करुन साजरा केला छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव

खामगाव:-छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सलग तिसऱ्या वर्षी फरशी मित्र मंडळाने रयतेच्या शिवरायांच्या जन्मोत्सव रक्तदानाने साजरा केला. रक्तदान शिबिरात ४५ युवा रक्तविरांनी रक्तदान करुन जन्मोत्सव साजरा केला. यानिमित्त संपुर्ण फरशी चौक भगव्या ध्वजांनी सजविण्यात आला होता. व ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली याप्रसंगी सामान्य रुग्णालयाची रक्तपिढी विभागातर्फे डॉ. सचिन बघे, राजेश्रीताई पाटील,ज्योती नाटेकर, प्रभाकर राठोड, काजल पोटे, यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सदर रक्तदान महाशिबीराची सुरवात झाली. या रक्तदान महाशिबीरात विठ्ठल क्षिरसागर, रामेश्वर चिताणे, अजय बैरागी पारस अगिणकर रविंद्र धोपटे, समिर पिवळटकर, विशाल बाराकिया, ऍ़ड. संजय बडगुजर, गोलु जोशी, निखिल थोरात, तेजस चिपडे, विक्की गंगासागर, सौरभ बाळापुरे, मंगेश गरुडे, वेदांत मानकर, प्रसाद जाधव, राजेश जाधव, अमित जयपुरीया, विशाल राहाटे,राजेश वाघ, प्रतिक देशमुख, प्रथम धोपटे, संदिप त्रिवेदी, अतिश अंबुसकर, सुमित वास्कर, प्रशांत शेटे, गौरव चुडीवाले, विजय दुतोंडे, कुणाल डाहाके, दिपक डाहाके, पंकज गोयेल, सुरज मेहरा, अमोल गावंडे, दिपक डाहाके, साहिल बोहरा, शुभम मोरे, आकाश पालीवाल, मोहन कवळे, निखिल वानखेडे, रुपेश अवस्थी , सन्नीसिंग गाडीवाले, अक्षय चोपडे, सचिन वानखडे, वैभव सपाटे, आदि रक्तविरांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्रकाश वानखेडे, राजेश पुरवार, सुरेश शर्मा, हरीष रानीवाल, श्याम शर्मा, विशाल चोपडे, छोटु जाधव , गणेश निबांळकर, जयेश जाधव, पिंटु जामोदे, ऋतिक निबांळकर, श्रवण जाधव अतुल काळे, दिलीप मिसर शैलेश तिवारी, संजय परकाळे, अविनाश वानखेडे, अक्षय मिश्रा, सागर जाधव, योगेश जाधव, शुभम मिश्रा, विजय निबांळकर, तुकाराम निबांळकर, ओम शर्मा, अमोल कुकडे, गौरव खत्री ,सोनु मिश्रा,राहुल मिश्रा, रतन चोपडे, सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवि जोशी तर आभार प्रदर्शन निखिल वानखेडे यांनी केले

Related posts

परिस

nirbhid swarajya

आमच्या औषधाने कोरोना रुग्ण३ दिवसात बरा होतो..

nirbhid swarajya

मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!