प. स .सभापती यांचे पती युवराज मोरे गाड़ी चालवत असल्याची माहिती
खामगाव : तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील विद्यार्थ्याला सभापती यांच्या महाराष्ट्र शासन लिहीलेल्या गाडीने उडवल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानगंगापूर येथील विद्यार्थी रोहन शिवाजी महाले वय १८ हा आपल्या पिंपळगाव राजा येथील मित्रासोबत खामगांव येथील आयटीआय मध्ये राहिलेल्या मशीनिस्ट ट्रेड विषयाचा फ्रॉम भरण्यासाठी आपल्या दुचाकी क्र. एम एच २८-११२२ ने येत असताना पिंपळगाव राजा जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ खामगाव पंचायत समितीच्या सभापती मोरे यांच्या शासकीय वाहनाने त्याला कट मारला व या धडकेत तो समोरून येणाऱ्या ऑटोला धडकला व गंभीर जखमी झाला. यावेळी तात्काळ तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्याला तात्काळ खामगाव येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती गेले होते मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की पंचायत समिती सभापती मोरे यांचे पती युवराज मोरे हे महाराष्ट्र शासनाची गाडी चालवत होते त्यांनी या ठिकाणी न थांबता मला अर्जंट काम आहे असे सांगून खामगाव येथे निघून गेले असे सांगितले. रोहनच्या मृत्युला युवराज मोरे हेच जबाबदार आहेत असा आरोप रोहनच्या नातेवाइकांनी केला आहे.
सभापती यांच्या पतीला महाराष्ट्र शासनाची गाडी चालवण्याचा अधिकार आहे का ? हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. तसेच अपघात झाल्यानंतर अपघात ग्रस्त युवकाला दवाखान्यात आणायचे सौजन्य सुद्धा सभापती यांचे पती युवराज मोरे यांनी दाखवले नाही. याबाबत ज्ञानगंगापूर च्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गाडी चालवणाऱ्या सभापतींच्या पती युवराज मोरे वर गुन्हा दाखल करावा व योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कुटूंबातील प्रवीण महाले, लक्ष्मण हेंड, संतोष महाले, तसेच ज्ञानगंगापूर ची सरपंच ज्ञानेश्वर महाले हे करीत आहे. घटनास्थळी पी राजा पोलीस दाखल झाले होते त्यानी पंचनामा करून गाडी पोलीस स्टेशन लावण्यात आली आहे. खामगाव सामान्य रुग्णालयाच्या डीडी वरून खामगाव शहर पोलीसांनी झिरोचा मर्ग दाखल केला आहे. रोहनच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे तर संपूर्ण ज्ञानगंगापूर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सभापती यांचे पती युवराज मोरे यांच्या सोबत निर्भिड स्वराज्य ने संपर्क केला असता त्यांनी यावर बोलणे टाळले.