October 6, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या

सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा शिवारातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळ्यात गळे घालून दोघांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या घटनेतील मुलगी केवळ ८ व्या वर्गात शिकणारी १३ वर्षाची विद्यार्थिनी आहे..दोघेही गेल्या ४ दिवसापासून बेपत्ता होते..प्राप्त माहितीनुसार मुलीचे नाव साक्षी संतोष अंभोरे (१३, रा. शेंदुर्जन) असे आहे तर मुलाचे नाव गोपाल समाधान खिल्लारे(२२) असे असल्याचे कळाले.तोही शेंदुर्जन येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. साखरखेर्डा शिवारातील एका झाडाला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही १८ डिसेंबर पासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने १८ डिसेंबरला साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांची मुलगी साक्षी गायब झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून त्याच दिवशी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.दरम्यान आज,२२ डिसेंबरला संध्याकाळी एका मुलीचा आणि मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर दोघांची ओळख पटली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रेमात अडथळा येत होता, त्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे.दरम्यान ४ दिवसांपासून दोघे गायब असल्याने त्यांनी आत्महत्या कधी केली,याबाबत अस्पष्टता आहे. मात्र प्रेमाचे काळे अन् तितकेच भयानक वास्तव या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे..शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांकडून पंचनामा सुरू होता.

Related posts

बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा आंदोलन…

nirbhid swarajya

केशरी शिधापत्रिका धारकांच्या धान्य कोट्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार

nirbhid swarajya

शेगाव पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता एलसीबीच्या जाळ्यात

nirbhid swarajya
error: Content is protected !!