April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र

प्रेमात जीव देण्याची धमकी देत व्हाट्सॲपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करून विध्यार्थीनीची बदनामी : तरुणाविरुद्ध गुन्हा

खामगाव२३ वर्षीय विद्यार्थीनीच्या सोबत शिकणाऱ्या तरुणाने प्रेम केले नाही तर जीव देईल अशी धमकी देत प्रेम करायला भाग पाडले .आणि काही दिवस फोनवर बोलल्यानंतर व्हाट्सॲप वर व्हिडिओ कॉल करून विध्यार्थीनीला कपडे काढायला लावून तिचा चोरून अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल केला व बदनामी केली .या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत असे की खामगाव शहरातील एका भागातील २३ वर्षीय विद्यार्थिनी व आरोपी सौरभ तिजारे हे दोघे सोबत शाळेत शिकत होते तेव्हा सौरभ तिजारे याने विद्यार्थिनीला तू प्रेम केलं नाही तर जीव देईल अशी धमकी दिली .या धमकीमुळे विद्यार्थीनीने घाबरून जात सौरभ तिजारे याला प्रेमात होकार दिला , तेंव्हा पासून सदर विद्यार्थीनी व सौरभ तिजारे हा नेहमी भेटत आणि बोलत होते दोन वर्षांपूर्वी सौरभ तिजारे याने विद्यार्थीनिला कॉल करून मी तुला व्हाट्सएपवर व्हिडीओ कॉल करतो आणि मी जसे सांगेल तसे कर नाही तर मी सर्व तुझ्या आई वडिलांना सांगेल अशी धमकी दिली.विध्यार्थीनीने धमकी दिल्याने भीती पोटी सौरभ तिजारे सांगेल तसे केले यावेळी सौरभ तिजारे याने व्हिडीओ कॉल वर विद्यार्थीनीला कपडे काढायला सांगितले धमकी दिल्याने भीती पोटी मुलीने सौरभ सांगेल त्या प्रमाणे कपडे काढले.मात्र यावेळी सौरभच्या मनात दुसरे काही होते त्याने याचा फायदा घेत व्हाट्सएप व्हिडीओ कॉल ची चोरून रेकॉर्डिंग केली .आणि सदर रेकॉर्डिंग २२ मार्च पूर्वी व्हायरल करून मुलीची बदनामी केली ही बाब मुलीला समजताच तिने २४ मार्च रोजी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला यावरून पोलिसांनी सौरभ तिजारे विरुद्ध १२१/२२कलम ३५४ (अ), ५०६भादवी, सहकलम ६६ (इ), ६७ माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .तपासा मध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोस्टेचे ठाणेदार अरुण परदेशी करीत आहेत.

Related posts

दुध उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या तिघाडी सरकारचा ‍निषेध- आ.फुंडकर

nirbhid swarajya

”स्वाभिमानी’ने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 197 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!