वेतनातील २३ हजाराचा दिला “कोरोना निधी”
बुलडाणा : गेल्या २० वर्षापासून हजारो प्रेतांचे पोस्टमार्टम करणाऱ्या सफाई कामगार मोहम्मद अफसर यांनी आपल्या वेतनातील २३ हजार रुपयांचा निधी कोरोनासाठी दिला आहे. त्यामूळे छिन्नविछिन्न प्रेताची चिरफाड करणाऱ्यालाही भावना असतात, त्यांचे मन देखील संवेदनशिल असते, हे अधोरेखीत झाले आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मूख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम करण्याचे काम करणाऱ्या मो. अफसर यांनी प्रतिसाद देत आपल्या वेतनातील २३ हजार रुपये कोरोना निधीसाठी दिले. ४ मे रोजी त्यांनी स्टेट बँकेत हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.अपघात, आत्महत्या अशा घटनेतील हजारो प्रेतांचे कठोरतेने पोस्टमार्टम करणाऱ्यालाही भावना असतात, यावरुन हे स्पष्ट झाले आहे.