October 6, 2025
खामगाव बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 32 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 35 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 32 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे ब्राम्हण चिकना ता. लोणार येथील 25 वर्षीय तरुणी, भुमराळा ता. लोणार येथील 40 वर्षीय महिला आणि जनुना ता. खामगाव येथील 34 वर्षीय पुरुष रूग्णाचे आहेत.
तसेच आतापर्यंत 1711 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 113 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी चार मृत आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 77 आहे. सध्या रूग्णालयात 32 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 13 जुन रोजी 35 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 03 पॉझीटीव्ह, तर 32 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 38 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1711 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

कोरोना लस घेतलेला कर्मचारी पॉझिटिव्ह !

nirbhid swarajya

चितोडा अंबिकापुर येथे आमदार राजेश एकडे यांची भेट

nirbhid swarajya

माजी मंत्री ॲयशोमती ठाकूर यांनी केला ७६च्या आणीबाणी काळातील जेलभरो आंदोलनात सहभागी विष्णू कानडे यांचा सत्कार…

nirbhid swarajya
error: Content is protected !!