चांदुर बिस्वा येथील एका रुग्णाला सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी तब्बल १३४ अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यापैकी १३१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ०३ अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेले अहवाल मलकापूर येथील ३९ वर्षीय व ६० वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुषाचे आहेत. सदर अहवाल यापूर्वी पॉझिटिव आलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. तसेच आज बुलडाणा येथील कोविड केअर सेंटर मधून चांदुर बिस्वा ता. नांदुरा २१ वर्षीय रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. मागील दहा दिवसांपासून कोरोना लक्षणे नसल्यामुळे सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १२०३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ५६ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत ३३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३३ आहे. सध्या रूग्णालयात २० कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज ३० मे रोजी तब्बल १३४ अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ३४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १२०३ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
सौजन्य – (जिमाका)