चाचणीस केलेला उशीर ठरू शकतो आपल्यासाठी व कुटुंबासाठी धोकादायक
खामगाव : संपूर्ण महाराष्ट्र सह जिल्ह्यात शुद्ध करणारी रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे अशातच प्रशासनातर्फे कोविड चाचणी करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र खामगाव येथील Covid-19 चे रुग्णा बाबत असे निदर्शनास येत आहे, कि बरेचशे रुग्ण त्रास वाढू लागल्यानंतर दवाखान्यात पोचतात त्यामुळे प्रकृती वेगाने ढासळून रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढत आहे. उपलब्ध सुविधा व त्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांनी थोडेजरी लक्षण जाणवले तरी ताबडतोब आपल्याला सोयीचे असलेले सामान्य रुग्णालय किंवा नगर परिषद रुग्णालय किंवा जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड चाचणी करून घ्यावी.
यावर लवकर उपचार सुरू केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. असे केल्यामुळे स्वतःसह कुटुंबातील व संप्रकातील व्यक्तींमध्ये होणारा कोविड संसर्गचा फैलाव टळू शकतो. यामुळे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की कुठलेही लक्षणे आपले कुटुंबातील सदस्य अथवा नातेवाईक यांचे मध्ये आढळून आल्यास लवकर चाचणी करून औधधोपचर सुरू करावा व संभाव्य हानी व त्रास टाळावा कोरोना चाचणी करण्यास उशीर केल्याने होणाऱ्या दुष्परिणाम गंभीर आहेत. त्यामुळे नागरिकांनी काही लक्षणे आढळले तर लवकरात लवकर चाचणी करुन घ्यावी असे आवाहन खामगांव येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.