स्मृतिदिनानिमित्त प्रमोद महाजन यांना अभिवादन
खामगाव : स्व प्रमोदजी महाजन यांच्या कार्यशैली मुळेच भाजप आज तळागाळातील जनसामान्य लोकांचा पक्ष म्हणून वटवृक्ष झाला असल्याचे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे संयोजक सागर फुंडकर यांनी केले. भाजपचे जेष्ठ नेते स्व प्रमोदजी महाजन यांच्या स्मृतीदिन निमित्त स्थानिक भाजप कार्यालयात छोटेखानी अभिवादन कार्यक्रम आज ३ एप्रिल रोजी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम सागर फुंडकर यांनी स्व प्रमोदजी महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, जिल्हा सचिव संजय शिनगारे, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, नगरसेवक राजेंद्र धानोकार, सतीशअप्पा दुडे, सत्यनारायण थानवी, जितेंद्र पुरोहित, महेंद्र रोहनकार, शेखर कुलकर्णी, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, बजरंग दल विभागीय संयोजक अमोल अंधारे, सुभाष इटणारे, गजानन मुळीक, आशिष सुरेखा, गजानन निर्मळ, प्रकाश बारगळ,राजूभाऊ पुरवार, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राजकीरण टिकार, प्रतीक मुंडे आदी भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सागर फुंडकर म्हणाले की भारतरत्न , माजी पंतप्रधान स्व अटल बिहारी वाजपेयी यांचे स्व प्रमोदजी आवडते नेते होते, त्यांना त्यांनी लक्ष्मणाची उपाधी दिली होती. भाजप स्थापने पासून पळतीच्या काळात स्व प्रमोदजी महाजन यांनी लोकनेते स्व गोपीनाथजी मुंडे, व भाऊसाहेब फुंडकर यांच्या समर्थ साथीने महाराष्ट्र तसेच देशात भाजप तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला. या महान नेत्यांच्या कार्यशैली मुळेच आज पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष उदयास आला आहे, त्यांचे प्रेरणेतून च आज देशाचा खरा विकास होत आहे असेही सागर फुंडकर यावेळी बोलले. याप्रसंगी उपस्थिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व महाजन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.