निधी समर्पण कार्यालयाचे आ.अँड.आकाश फुंडकर यांचे उपस्थितीत श्री क्षेत्र अटाळी येथे उदघाटन
खामगाव : प्रभू श्री राम मंदिराचे निर्माण आपल्या जन्मी होत आहे हे आपले खूप भाग्य आहे.मंदिर निर्माणसाठी शक्य होईल तेवढा सर्वांनी निधी देऊन या ऐतिहासिक घटनेत योगदान द्यावे असे आवाहन ह भ प ,रामायनाचार्य तसेच श्री विठ्ठल रुखमाई भोजने महाराज संस्थानचे विश्वस्त श्री संजय महाराज पाचपोर यांनी केले आहे. प्रभू श्री राम जन्मभुमी मंदिर तिर्थक्षेञ निधी समर्पण व गृह संपर्क अभियान लाखनवाडा प्रखंड कार्यालयाचे उद्घाटन श्रीक्षेत्र अटाळी येथे ह.भ.प.गोरक्षक रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या शुभहस्ते आज 20 जानेवारी रोजी पार पडले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधान सभा मतदारसंघाचे आमदार श्री विठ्ठल रुखमाई , भोजने महाराज संस्थांन अटाळी चे अध्यक्ष आकाश फुंडकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले त्यावेळी त्यांनी उपस्थिताना सदर आवाहन केले. यावेळी संस्थांचे विश्वस्त रामायनाचार्य ह भ प संजय महाराज पाचपोर व आ अँड.आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते श्रीराम प्रभु च्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बजरंग दल विभागीय संयोजक अमोलजी अंधारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी,तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, कैलास ढोले, कृष्णा ठाकुर, श्रीधर पांढरे, गजानन पांढरे, गजानन गीरी,शिवशंकर लगर,कैलास मसरे,गजानन गीरी,सोपान फुंडकर,अनंता बावस्कार, राजाराम महाले,श्रीधर राऊत,वैभव टेकाळे,निवृत्ती महाले, विठ्ठल दांदळे, नारायण दांदळे,पंकज गोल्लर यांचेसह भाजप, विहिप चे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.आजच्या उद्घाटनच्या शुभ प्रसंगी युवा उद्योजक शिवशंकर लगर रा पेडका पतोंडा यांनी प्रभू श्री राम मंदिर निर्माण साठी 11111 रु.चा निधी ह भ प श्री संजय महाराज पाचपोर यांचे कडे सुपूर्द केला. यावेळी लगर यांचा सत्कार आमदार अँड.आकाश फुंडकर यांचे हस्ते करण्यात आला.