खामगाव : २१ व्या शतकात मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात अतुलनीय बदल झाले आहेत. पुर्वीचा पोस्टमनमार्फत होणारा पत्रव्यवहार बंद होऊन बराच काळ उलटला आहे. लहानपणीचं ‘आई माझं पत्र कधीच हरवलेल आहे ‘ अर्थातच या पत्राची जागा आता मोबाईलनेच घेतली आहे. नजिकच्या काळात सोशल मिडीयानं थैमान घातलं आणि या थैमानाचा परिणाम असा झाला की आजची तरूणाई सोशल मिडीयाच्या व्यसनाधिन झाली आहे. आज एवढी जाणीवता नसली तरी येणाऱ्या काळात याची भयानकता खूप जाणवेल.सर्वांनी याची झलक बघितली असेलच. सोबत च सोशल मिडीया चे खूप फायदे आहेत ते ही आपल्याला माहिती आहेत. सध्याच्या युगात आपण सोशल मीडियापासून मुलांना दूर ठेवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण दहावीपर्यंत मोबाइल देणार नाही हे म्हणणेही आता पालकांना अवघड आहे. पण काही वेळा सुरक्षेची गरज म्हणून मुलांना मोबाइल द्यावा लागतो. मोबाइल कोणता द्यावा, किती महागातला द्यावा यावर पालकांचे नियंत्रण नसते. ऐपत आहे म्हणून मुलांना महागडा मोबाइल घेऊन देतात मात्र या गोष्टीला अपवाद ठरलेले जागरूक पालक म्हणजे महाराष्ट्र भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व वंचीत बहुजन आघाडीचे संसदीय सदस्य मा.अशोक भाऊ सोनोने. ज्यांनी आपल्या मुलाला वयाच्या १८ वर्षे २ महिन्यानंतर मोबाईल घेऊन दिला तो सुध्दा सॅमसंग कंपनीचा विनाअँड्रॉइड मोबाईल! मोबाइलचा रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू असत आणि प्रलोभनांमध्ये सर्व तरुण अडकत जातात यामुळे आपल्या मुलाला सोशल मीडिया वापरण्यासह इतर गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे लक्षात घेत जागरूक होऊन ‘आर्टिफिश इंटेलिजन्स’ पेक्षा ‘नॅचरल इंटेलिजन्स’ अधिक जवळचा असतो हे दाखवून दिले. पालक आणि त्यांची मुले यांच्यात मोबाइल वापरासंदर्भात समजूतदारपणा, परिपक्व संवाद यातूनच मार्ग निघू शकतो व इतरही पालकांनी याबाबतीत जागरूकता दाखवली तरच उद्याची पिढी अधिक निरोगी व सक्षम घडण्याची शक्यता नक्कीच वाढेल.